कामाच्या ठिकाणी केवळ ट्राफिकमुळे पोहचवण्यास विनाकारण उशीर होत असेल तर तुमचाही रागाचा पारा चढतोय का ? मग तुम्ही स्वतःला शांत करण्यासाठी या काही गोष्टींची मदत घेऊ शकता. योगसाधनेच्या मदतीने रागावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. मनाला शांत ठेवण्या साठी. पद्मासनात बसा. तुमच्या दोन आयब्रो मधील म्हणजेच तिसरा डोळा समजला जाणाऱ्या भागावर लक्ष ठेवा. जस जसा तुमचा रागाचा पारा वाढतोय असं दिसेल तसे तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायला सुरूवात करा. ५-६ दीर्घ श्वास घ्या. श्वास आत घेताना ५ अंक मोजा. श्वास सोडल्यानंतर पुन्हा ५ अंक मनातल्या मनात मोजायला सुरूवात करा. श्वास घेण्यापेक्षा उच्छवास सोडण्याची प्रकिया थोडी दीर्घ ठेवा. मुष्ठि मुद्रा म्हणजे हाताची मुठ बनवणे. या मुद्रेमध्ये किमान ५-१० मिनिटे रहा. यामुळे रागावर नियंत्रण राहण्यास मदत होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews